Maharashtra State ST Corporation: नाशिक-बोरिवली प्रवास सुखकर होणार, पहिली इलेक्ट्रिक बस ताफ्यात दाखल

या नवीन पर्यावरणपूरक ९ मीटर बसगाड्यांमुळे प्रवास जलद आणि अधिक सुखकर होण्यास मदत होईल.

196
Maharashtra State ST Corporation: नाशिक-बोरिवली प्रवास सुखकर होणार, पहिली इलेक्ट्रिक बस ताफ्यात दाखल
Maharashtra State ST Corporation: नाशिक-बोरिवली प्रवास सुखकर होणार, पहिली इलेक्ट्रिक बस ताफ्यात दाखल

महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या (Maharashtra State ST Corporation) नाशिक विभागाच्या ताफ्यात पहिली नवी कोरी ३४ आसनी इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे. नाशिक ते बोरिवली मार्गावर ही बस धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’, असे ब्रिदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाकडून प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एसटीकडून पुनरुज्जीवन आराखड्याअंतर्गत पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बसेसची खरेदी केली जात आहे. सर्वप्रथम ताफ्यात ई-शिवाई बसेस दाखल केल्यानंतर एसटी प्रशासनाने आता ३४ आसनी ९ मीटरच्या छोट्या बसेसदेखील टप्प्याटप्प्याने ताफ्यात दाखल होतील, अशी माहिती दिली आहे.

(हेही वाचा  – Manoj Jarange Patil : इथे अजित पवार तोंड का उघडत नाहीत? जरांगे पाटील यांची टीका)

प्रवास जलद आणि अधिक सुखकर
एसटीच्या नाशिक विभागामध्ये पहिली ९ मीटरची बस दाखल झाली आहे. ही नवीन बस नाशिक ते बोरिवली या मार्गावर सोडण्यात येणार आहे. मुंबईतील वाहतुकीच्या समस्येमुळे प्रवासात जास्त वेळ जातो. आता या नवीन पर्यावरणपूरक ९ मीटर बसगाड्यांमुळे प्रवास जलद आणि अधिक सुखकर होण्यास मदत होईल. येत्या काळात टप्प्याटप्प्याने १० बसेस नाशिकमध्ये दाखल होतील, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.