एप्रिल महिन्याच्या तिस-या आठवड्यापासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून ती हजाराच्या उंबरठ्यावर आली आहे. मंगळवारी राज्यात १८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९५५ पर्यंत पोहोचली.
( हेही वाचा : कोकण रेल्वेचा प्रवास अधिक गारेगार )
वाढत्या कोरोना रुग्णांचा फटका प्रामुख्याने शहरांत दिसत आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि अहमदनगराला आठवड्याच्या सुरुवातीलाच रुग्णसंख्या वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. यासंबंधीच्या सूचना राज्य आरोग्य विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांनाही दिल्या. सध्याच्या परिस्थितीत सातारा, सांगली, जळगाव, लातूर, उस्मानाबाद, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा आणि चंद्रपूरात एकही कोरोना रुग्णांची नोंद नाही. गडचिरोली, गोंदिया, बुलडाणा, अमरावती, परभणी, नंदुरबार, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आता कोरोनाच्या प्रसाराला सुरुवात झाली आहे.
कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेले जिल्हे
- मुंबई – ५६३
- पुणे – २१९
- ठाणे- ७६
- अहमदनगर – १८
- रायगड – १३
- नाशिक – १३
- धुळे – १५