अलिबाग तळीये येथील दरड कोसळून 22 जुलै 2022 ला एक वर्ष पूर्ण झालं, मात्र या काळरात्रीच्या आठवणी आजही गावक-यांच्या मनात ताज्या आहेत. गेल्यावर्षी दरड कोसळून सर्वस्व गमावलेल्या तळिये ग्रामस्थांनी डोक्याला छप्पर म्हणून कंटेनरमधील घरांचा आसरा घेतला आहे. येथे वास्तव्य केलेल्या दरडग्रस्तांना मात्र आता आपल्या घराचे वेध लागले आहेत.
( हेही वाचा: आता काॅंग्रेसचे 20 माजी नगरसेवकही मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला )
अद्यापही घराच्या प्रतिक्षेत
महाडवर 22 जुलैला मोठे अस्मानी संकट कोसळले होते. अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील सर्वच नद्यांना पूर आला होता. अशातच संध्याकाळी साडेचारच्या सुमारास दुर्गम भागातील तळिये गावाच्या कोंडाळकरवाडीवर मोठी दरड कोसळली आणि त्यात 36 घरे उद्ध्वस्त झाली. या भीषण घटनेत 87 जणांचा मृत्यू झाला. दगड-मातीच्या ढिगा-याखाली अनेक घरे, माणसे, जनावरे गाडली गेली. या घटनेला या 22 जुलैला एक वर्ष होत आहे. मात्र या दुर्घटनेत आपले सर्वस्व गमावलेल्यांना एका तात्पुरत्या कंटनेरमधील घरांमध्ये दिवस काढावे लागत आहेत.
Join Our WhatsApp Community