Kalsubai Shikhar: महाराष्ट्रातील सर्वोच्च ‘हे’ शिखर गाठणं आता सोपं होणार, कारण …वाचा सविस्तर

235
Kalsubai Shikhar: महाराष्ट्रातील सर्वोच्च 'हे' शिखर गाठणं आता सोपं होणार, कारण ...वाचा सविस्तर
Kalsubai Shikhar: महाराष्ट्रातील सर्वोच्च 'हे' शिखर गाठणं आता सोपं होणार, कारण ...वाचा सविस्तर

अकोला तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेले ‘कळसुबाई शिखर’ (Kalsubai Shikhar) सर करणं आता सोपं होणार आहे. या शिखरावर ये-जा करण्यासाठी रोप वे उभारण्याबाबत बैठक झाली. या बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे.

स्वातंत्र्यसेनानी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथील स्मारकाच्या उभारणीसाठी ४८३ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली तसेच कळसुबाई शिखरावर रोप वे उभारण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात नुकत्याच झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. शनिवार, ३० डिसेंबरला यासंदर्भात स्मारक समितीची बैठक होणार आहे.

(हेही वाचा – BAPS Hindu Mandir: अबुधाबीमध्ये पहिले भव्य हिंदू मंदिर उभारणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले उद्घाटनाचे निमंत्रण)

देखभाल दुरुस्तीचे काम आदिवासी विभागाकडून…

स्मारकापासून जवळच असलेल्या कळसुबाई शिखरावर ये-जा करण्यासाठी रोप वे उभारण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार, २११ कोटी रुपये रकमेचा स्वतंत्र डीपीआर तयार करून केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेत मंजुरीसाठी पाठवण्यात यावा, असा याआधी बैठकीत झाला होता. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिल्याची चर्चा झाली. त्यामुळे स्मारकाचा खर्च सुमारे ४८३ कोटी रुपयांपर्यंत करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली. स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीचे काम आदिवासी विभागामार्फत करण्याचे या बैठकीत ठरले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.