महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Exam) २०२४ घेण्याची जबाबदारी सोपविलेली आहे. ही परीक्षा १० नोव्हेंबर, २०२४ रोजी घेतली जाणार आहे, असे पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त यांनी कळविले आहे.
(हेही वाचा – BJP Candidate List : भाजपाच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला)
इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षण सेवक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवर्य आहे. या परीक्षेशी संबंधित सर्व शासन निर्णय, अनुषंगिक माहिती, सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे, परीक्षेची वेळ व इतर सविस्तर माहितीचा तपशिल परिषदेच्या वेबसाईटवर देण्यात आला आहे. सर्व संबंधितांनी संकेतस्थळास नियमित भेट द्यावी. (Teachers Exam)
(हेही वाचा – ‘ते आपल्या देवी-देवतांना देव मानत नाहीत…’, पंतप्रधान Narendra Modi यांचा राहुल गांधींवर घणाघात)
या परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ९ सप्टेंबर, २०२४ पासून सुरु झाली असून ३० सप्टेंबर, २०२४ अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ३० सप्टेंबर, २०२४ पर्यंत असून प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्याची मुदत २८ ऑक्टोबर, २०२४ ते १० नोव्हेंबर, २०२४ पर्यंत राहील. १० नोव्हेंबर, २०२४ वेळ सकाळी १०.३० ते दुपारी १ या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. I घेतला जाणार आहे. तसेच १० नोव्हेंबर, २०२४ वेळ दुपारी २ ते दुपारी ४.३० या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्र. II घेण्यात येईल. (Teachers Exam)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community