
राज्याच्या (Maharashtra Temperature) बहुतांश भागात तापमानाचा (Temperature Today) पारा चढाच असून नोंदवलेल्या तापमानानुसार, (Weather) बहुतांश भागात 36 ते 40 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा भडका उडाला असल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होताना दिसतेय. येत्या 4 ते 5 दिवसात मुंबई, पुण्यासह विदर्भ (Vidarbha) आणि राज्यातील काही जिल्ह्यात उष्माघाताची लाट येण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. (Maharashtra Temperature)
हेही वाचा-BMC : महापालिकेच्या रस्ते विभागाच्या कार्यालयासाठीच सल्लागार नेमण्याची आली वेळ
होळी आधीच राज्यात तापमान वाढताना दिसते आहे. गुजरात आणि राजस्थानमधील अधिक शहरांमध्ये तापमान ४० अंशांपुढे गेले आहे. अनेक ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा ८.८ अंश सेल्सियसने जास्त आहे. विदर्भातील अनेक शहरांत बुधवारी (12 मार्च) ४० अंशांपेक्षा जास्त तापमान होते. गुरुवारपासून गुजरात, राजस्थान आणि पश्चिम किनारपट्टीवरील कोकण प्रदेशात तापमान घटण्याची शक्यता आहे, परंतु उष्णतेची लाट कायम राहील. (Maharashtra Temperature)
नंदूरबारमध्ये तापमानाचा पारा 40.8 अंशांवर जाऊन टेकलाय. नाशिकमध्ये वाढत्या तापमानझळांनी प्रशासन अलर्टमोडवर आलंय. नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये 10 बेडचे उष्माघात कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी सिंधुदूर्गात उष्णतेची लाट नसली तरी उष्ण व दमट तापमानाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. राज्यात येत्या 4 दिवसांत तापमान चढेच राहणार असल्याचे पुणे हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितलंय. पूर्वेकडून वाहणारे उष्ण वारे सक्रिय असल्याने चढ्या तापमानाचा सामना चाकरमान्यांना करावा लागत आहे. (Maharashtra Temperature)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community