मुंबई सर्वाधिक उष्ण शहर; पारा 6 अंशाने वाढला

मुंबई उपनगर हा सोमवारी राज्यातील सर्वाधिक उष्ण परिसर होता. येथे पारा 6.4 अंशांनी वाढल्याने कमाल तापमान 39.3 अंश सेल्सिअस होता. मात्र, अलिबागमध्ये सर्वाधिक 7.5 अंश सेल्सिअसची वाढ नोंदवण्यात आली. असे असतानाही येथील कमाल तापमान केवळ 38 अंश सेल्सिअस राहिले.

मुंबईच्या तापमानात 6 अंश सेल्सिअसने वाढ

प्रादेशिक हवामान केंद्राचे (मुंबई) म्हणणे आहे की, जोरदार पूर्वेकडील वाऱ्यांमुळे सोमवारी मुंबईचे तापमान 39.3 अंश सेल्सिअस होते. याशिवाय सागरी वारे वाहण्यास उशीर झाल्याने मुंबईतील तापमानात वाढ झाली. सोमवारी मुंबईत उष्णता वाढली असली तरी मंगळवारी तापमानात घट होण्याची शक्यता आहे. कारण आज (मंगळवारी) मुंबईत हलक्या पावसाची शक्यता आहे.

(हेही वाचा ठाण्यात शिवसेना आणि ठाकरे गट आमने-सामने; शिवाई नगरमध्ये राडा)

मुंबई उपनगराचे तापमान 39.3 अंश

विशेष म्हणजे सोमवारी मुंबई उपनगराचे तापमान 39.3 अंश सेल्सिअस तर शहराचे तापमान 37 अंश सेल्सिअस होते. मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून तारा वाढत आहे. त्यामुळे उष्णता सातत्याने वाढत आहे. सोमवारी मुंबई उपनगरात 6.4 अंश सेल्सिअस आणि शहराच्या तापमानात 5.7 अंश सेल्सिअसची वाढ नोंदवली गेली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here