महाराष्ट्राला लवकरच पहिली वंदे भारत ट्रेन मिळणार आहे आणि ही वंदे भारत ट्रेन मुंबई- पुणे दरम्यान धावणार आहे. 15 ऑगस्टपर्यंत वंदे भारत ट्रेनच्या फे-या सुरु होणार आहेत. त्यामुळे आता अवघ्या अडीच तासांत मुंबई-पुणे प्रवास करता येणार आहे.
सध्या मुंबई-पुणे प्रवास करण्यासाठी 3 तास 10 मीनिटे लागतात. हा सगळ्यात वेगवान प्रवास डेक्कन एक्सप्रेसमुळे शक्य आहे. पण आता वंदे भारत ट्रेन सुरु झाल्यानंतर, हाच प्रवास फक्त अडीच तासांवर येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा बराचसा वेळ वाचणार आहे.
( हेही वाचा: IIT कडे केली पाठ, तरी जगात मान ताठ! मुकेश अंबानींसह देशातील १० गर्भश्रीमंतांची गोष्ट )
मुख्य शहरांना जोडण्यासाठी वंदे भारतची निर्मीती करण्यात आली होती. येत्या काळात केंद्र सरकारकडून संपूर्ण देशभरात 400 वंदे भारत ट्रेन धावणार आहेत. यामध्ये सध्या वाराणसी- नवी दिल्ली, वैष्णोदेवी -वाराणसी अशा वंदे भारत सध्या सुरु आहेत.