Rain : कोकण, विदर्भात पुढील 5 दिवस संततधार; रायगड, रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा इशारा

180

कोकणातील रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातील बहुतांश जिह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे, तर काही भागात अतिवृष्टी झाली आहे.

पालघरमध्ये पुरेसा धरणसाठा

पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असून जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह वसई विरार आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे. धामणी धरण 81.64 टक्के भरले आहे, तर कवडास धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण क्षेत्रामध्ये 2 हजार 284 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, पिंजाळ या नद्यांच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे.

(हेही वाचा Government Report : घरापासून दूर असल्यावर 56% मुली ठेवतात शारीरिक संबंध; सरकारचा धक्कादायक अहवाल)

पंचगंगेचे पाणी इशारा पातळीकडे

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग सुरूच असल्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यांना वाढ झालीय. पंचगंगा नदी आता इशारा पातळीकडे वाटचाल करत असल्यामुळे जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलं आहे. सध्या पंचगंगा नदी 38 फुटांवरून वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना स्थलांतरित होण्याचा सूचना दिल्या जात आहेत. कोल्हापुरात महापुराचा सर्वाधिक फटका आंबेवाडी आणि चिखली गावाला बसतो, सध्या ग्रामपंचायतकडून या गावांना स्पीकरच्या सहाय्याने आवश्यक साहित्यासह सायंकाळपर्यंतच गाव सोडण्यासाठी सांगितलं जात आहे.

वर्ध्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

वर्ध्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यानाल्यांना पूर आलाय.. निम्न वर्धा धरणाचे 25 दरवाजे उघडण्यात आले आहे. निम्न वर्धा प्रकल्पातुन पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने वर्धा आणि यशोदा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालीये.. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेय.

रत्नागिरीत तीन नद्या तुडुंब

कोकणात गेले तीन दिवस पावसाची संततधार सुरु आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पुढचे पाच दिवस मुसळधार पाउस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.. जिल्ह्यातील तीन नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. खेड मधील..जगबुडी नदी, संगमेश्वर मधील..शास्त्री नदी, राजापूर मधील..कोदवली नदी या नद्यांचा समावेश आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.