राज्यात कोरोनाचे 67 हजार 123 नवे रुग्ण, मृतांचा आकडाही 400 पार

शनिवारी, १७ एप्रिल रोजी दिवसभरात ८,८३४ रुग्ण आढळून आले. शुक्रवारी दिवसभरात ५० हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्याने शनिवारी रुग्णांची संख्या अधिक आढळून येण्याची शक्यता वर्तवली जात होती.

राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सध्या महाराष्ट्रात रोज 60 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळत आहे. शनिवार, 17 एप्रिल रोजीची आकडेवारी तर चिंतेत पाडणारी आहे. दिवसभरात महाराष्ट्रात तब्बल 67,123 नवे कोरोनाग्रस्त आढळले. हा आकडा शुक्रवारच्या तुलनेत 5 हजार 428 रुग्णांनी जास्त आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना आलेख वर जात असून रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्यात मृतांची संख्यासुद्धा रोज वाढत आहे. दिवसभरात राज्यात 419 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर दिवसभरात एकूण 56 हजार 783 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईत चाचण्यांची संख्या वाढली, तरीही रुग्णसंख्या नऊ हजारातच

मुंबईतील वाढत्या रुग्ण संख्येमुळे चिंता व्यक्त केली जात असली तरी शनिवारच्या रुग्णांच्या आकडेवारीने ही संख्या ९ हजाराच्या आत नियंत्रणात राखण्यात यश मिळत आहे. शनिवारी, १७ एप्रिल रोजी दिवसभरात ८,८३४ रुग्ण आढळून आले. शुक्रवारी दिवसभरात ५० हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्याने शनिवारी रुग्णांची संख्या अधिक आढळून येण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु शुक्रवार जिथे ८,८३९ रुग्ण आढळून आले होते, तिथे शनिवारी ८,८३४ एवढे रुग्ण आढळून आल्याने मुंबईकरांसाठी ही समाधानाची बाब समजली जात आहे.

(हेही वाचा : सावधान! रस्त्यावर थुंकल्यास आता पोलिस कारवाई!)

दिवसभरात ४७ हजार २५३ चाचण्या   

मुंबईत शनिवारी दिवसभरात ६,६१७ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर दिवसभरात ५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेल्यांमध्ये ३३ रुग्ण हे दिर्घकालीन आजार असलेले होते. तर यामध्ये ३५ पुरुष आणि  १७ रुग्ण महिलांचा समावेश होता. २२ रुग्ण हे  ४० ते ६० वयोगटातील असून ४ रुग्ण हे ४० वर्षांखालील वयोगटातील होते. तर दिवसभरात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी कमी चाचण्या झाल्या आहेत. शनिवारी दिवसभरात ४७ हजार २५३ चाचण्या करण्यात आल्या

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here