प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र अव्वल; कृषिमंत्री Manikrao Kokate यांची माहिती

राज्यात २२६३ कोटींची गुंतवणूक, ३८९ कोटी अनुदान वाटप

30
प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्र अव्वल; कृषिमंत्री Manikrao Kokate यांची माहिती
  • प्रतिनिधी

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र देशात आघाडीवर असून राज्यातील २२,०१० प्रकल्प मंजूर झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे सर्वाधिक १,८९५ प्रकल्प मंजूर असून, देशात २२,००० प्रकल्प मंजुरीचा टप्पा ओलांडणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे, अशी माहिती कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी दिली.

महाराष्ट्र देशात प्रथम

बिहार राज्य २१,२४८ प्रकल्पांसह दुसऱ्या स्थानी, तर उत्तर प्रदेश १५,४४९ प्रकल्पांसह तिसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्रात प्रकल्प मंजुरीत छत्रपती संभाजीनगर प्रथम, अहिल्यानगर द्वितीय आणि सांगली जिल्हा तृतीय स्थानावर आहे. या योजनेतून २२६३ कोटींची गुंतवणूक झाली असून, ३८९ कोटी रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले आहे. (Manikrao Kokate)

योजनेचे लाभ व आर्थिक सहाय्य

नवीन व चालू सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना विस्तारीकरण, स्तरवृद्धी व आधुनिकीकरणासाठी बँक क्रेडिट लिंक्ड सबसिडी दिली जाते. (Manikrao Kokate)

(हेही वाचा – मच्छिमार संस्थांसाठी समन्यायी तलाव वाटपाचे धोरण; महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांची माहिती)

  • वैयक्तिक व गट लाभार्थींसाठी प्रकल्प किमतीच्या ३५% पर्यंत, जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंत सहाय्य.
  • सामाईक पायाभूत सुविधा, मूल्यसाखळी, इनक्युबेशन केंद्रांसाठी ३५% सहाय्य, कमाल ३ कोटी रुपये.
  • बीज भांडवलासाठी प्रति सदस्य ४०,००० रुपये व प्रति गट ४ लाख रुपयांपर्यंत सहाय्य.
  • मार्केटिंग व ब्रँडिंगसाठी ५०% प्रतिपूर्ती.
योजनेत विविध प्रकल्प

राज्यात तृणधान्य (४,३६९), मसाले (३,५२२), भाजीपाला (३,२४२), कडधान्य (२,७२३), फळ (२,१६०), दुग्ध (२,०९९), तेलबिया (८३०), पशुखाद्य (५५३), ऊस (४४६) आदी विविध क्षेत्रांत प्रकल्प मंजूर. (Manikrao Kokate)

ऑनलाइन अर्ज व मोफत सहाय्य

योजनेत अर्जदारांना www.profme.mofpi.gov.in वर अर्ज करता येईल. ग्रामीण भागासाठी www.nrim.gov.in व शहरी भागासाठी www.nutm.gov.in संकेतस्थळावर अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा कृषी कार्यालये व बँकांशी संपर्क साधावा, असे कृषी आयुक्तालयाने कळविले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.