गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून जाताना कोकणवासीयांच्या मार्गात अडथळे येऊ नयेत, यासाठी नवी मुंबईत प्रमुख विभागांच्या उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वाहतूक विभागाचे महाराष्ट्र अप्पर पोलीस महासंचालक रविंद्र सिंगल यांनी मुंबई-गोवा महामार्गाबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.
मुंबई आणि गोवा महामार्गाद्वारे जोडण्याचे काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे.या महामार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत तसेच या महामार्गावरून कोकणाकडे जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या महामार्गाचा 42 किलोमीटरचा भाग खुला करण्याचे राष्ट्रीय प्राधिकरणाचे प्रयत्न आहेत. येत्या काही दिवसांत पनवेल ते रायगडच्या कासूपर्यंत एका बाजूची लेन खुली करण्यात आली आहे. पनवेल ते कासूदरम्यान 32 किलोमीटर पट्ट्याचे काम पूर्ण झालं आहे. या मार्गावरील काम वेगाने करण्यात येत आहे.
(हेही पहा – Delhi : जी-२० परिषदेसाठी राजधानी सज्ज)
या बैठकीत महासंचालकांनी मुंबई-गोवा महामार्गावर सर्व यंत्रणेने एकत्र मिळून सर्व्हे करत अडथळे दूर करणे, अपघात होणारे ब्लॅक स्पॉ शोधणे, लहान मुलांच्या मातेसाठी फिडींग सेंटर उभारणे, जड वाहनांच्या रहदारीवर ठोस उपायोजना करण्याच्या सूचना केल्या. गणेशोत्सवापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असल्याची माहिती या बैठकीदरम्यान महासंचालक सिंगल यांनी दिली होती.
या बैठकीला नवी मुंबई वाहतूक उपायुक्त, रायगड पोलीस अधीक्षक, एमएसआरडीसी आणि आरटीओचे प्रमुख उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community