अधिकृत अनलॉकची घोषणा! गोंधळ संपला!

येत्या 7 जूनपासून 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. 

116

आपत्ती व्यवस्थापन बैठकीनंतर घिसाडघाईने अनलॉकची घोषणा करणाऱ्या मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यामुळे राज्यात चांगलेच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे हा गोंधळ मिटवण्यासाठी अखेर राज्य सरकारला दुसऱ्याच दिवशी अगदी मध्यरात्री अधिकृत परिपत्रक काढून अनलॉक जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या 7 जूनपासून 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. कोरोनाची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत.

पहिल्या गटात काय सुरु राहणार? 

  • सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार.
  •  मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहसुद्धा नियमितपणे सुरू होणार
  •  रेस्तराँ सुरू करण्यासाठीही परवानगी.
  • लोकल सेवा पूर्ववत होईल मात्र, स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्बंध घालण्याची मुभा असेल.
  • सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल.
  • सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा.
  • शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील.
  •  विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल.
  • लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने नसतील.
  • जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी असणार आहे.
  •  सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत  करण्यात आली आहे.
  •  या भागात जमावबंदीही नसणार आहे.

पहिल्या लेव्हलमधील जिल्हे  कोणते?

अहमदनगर, चंद्रपूर, भंडारा, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर.

दुसऱ्या गटात काय सुरु राहणार? 

  • या गटात जे जिल्हे असतील तिथे सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ सुरू राहतील.
  • मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी
  • रेस्टॉरंटसाठीही ५० टक्के क्षमतेने परवानगी.
  • लॉकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी.
  • सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील.
  • वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल.
  • सर्व खासगी कार्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील.
  • विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ अशी वेळ राहील.
  • चित्रीकरण नियमितपणे करता येईल.
  • सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल.
  • लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त १०० जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल.
  • अंत्यविधीसाठी कोणतेही बंधन नसेल, बैठका, निवडणूक यावरही कोणतीच बंधने नसतील.
  • जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना ५० टक्के क्षमतेने परवानगी.
  • सार्वजनिक वाहतूक सेवा १०० टक्के क्षमतेने सुरू होईल. आसन क्षमतेइतकेच प्रवासी प्रवास करू शकतील.
  • या भागात जमावबंदी लागू असेल.

दुसऱ्या लेव्हलमधील जिल्हे कोणते? 

हिंगोली, नंदुरबार.

तिसऱ्या गटात काय सुरु राहणार? 

  • अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते २ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ सर्व खुले राहतील
  • माॅल्स थिएटर्स सर्व बंद राहतील
  • सोमवार ते शुक्रवार हाॅटेल्स ५० टक्के खुले दुपारी २ पर्संत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार बंद राहतील
  • लोकल रेल्वे बंद राहतील
  • मॉर्निंक वाॅक, मैदाने , सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ मुभा
  • ५० टक्के खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू
  • आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ सुरू सोमवार ते शुक्रवार
  • स्टुडियोत चित्रीकरण परवानगी सोमवार ते शनिवार करता येईल
  • मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के दुपारी २ पर्संत खुले असणार सोमवार ते शुक्रवार
  • लग्नसोहळे ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोक मुभा असतील
  • बांधकाम दुपारी दोन पर्यंत मुभा
  • कृषी सर्व कामे मुभा
  • ई काॅमर्स दुपारी २ पर्यंत
  • जमावबंदी \ संचारबंदी कायम राहील

तिसऱ्या लेव्हलमध्ये कोणते जिल्हे?

अकोला, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, गडचिरोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड.

चौथ्या गटात काय सुरु राहणार? 

  • अत्यावश्यक सेवा २ वाजेपर्यंत सुरु
  • सरकारी खासगी कार्यालयात २५ टक्के क्षमतेने
  • क्रीडा पाच ते ९ आऊटडोअर सुरु राहणार
  • सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम नाही
  • लग्न सभारंभाला २५ लोकांची उपस्थिती
  • अंतयात्रेला २० लोक उपस्थित राहणार
  • बांधकामासाठी फक्त ऑनसाईट कामगार काम करणार
  • शेतीची कामं २ वाजेपर्यंत करता येणार
  • ई कॉमर्स फक्त अत्यावश्यक सेवेसाठी उपलब्ध
  • संचार बंदी लागू असणार
  • सलून, जिम ५० टक्के क्षमता सुरु राहणार,
  • बसेस ५० टक्के विना उभे राहणारे प्रवाशी

चौथ्या लेव्हलमध्ये कोणते जिल्हे?

बुलढाणा, कोल्हापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, सातारा.

पाचव्या गटात एकही जिल्हा नाही!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.