राज्यात गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात सामान्य तापमानाच्या (Maharashtra Weather) तुलनेत अधिक तापमान नोंदवलं गेलं. कोकण, विदर्भात तर 1-3 अंशांनी वाढ झाली होती. आता जरी उत्तरेकडे थंडीची (Winter) लाट असली तरी येत्या काही दिवसात दक्षिणेकडील काही राज्यांसह उत्तरेतील जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) आणि हिमाचल प्रदेशात पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात येत्या ३ दिवसात तापमान कोरडे राहणार असले तरी 2-4 अंशांनी वाढ होणार असल्याचं वर्तवण्यात आला आहे. (Maharashtra Weather)
हेही वाचा-पुण्यातही Railway Track वर गॅस सिलिंडर ठेवून घातपाताचा प्रयत्न
हवामान विभागाने दिलेल्या माहितीमुसार, देशभरात यंदाच्या जानेवारी महिन्यात तुलनेनं तापमान अधिक असेल. पूर्व, उत्तर पश्चिम, पश्चिम मध्य क्षेत्र वगळता उर्वरित भागांमध्ये तापमान सामान्यहून अधिक असेल. राहिला प्रश्न पर्जन्यमानाचा, तर देशात जानेवारी महिन्यातील पावसाचं प्रमाणही तुलनेनं कमीच असेल. महाराष्ट्रात डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यामध्ये हवामानात झालेल्या सातत्यपूर्ण बदलांमुळं थंडीचा कडाका कमी झाला असून, सध्याच्या घडीला बहुतांश भागांमध्ये पहाटे धुकं, दुपारच्या वेळी सूर्याचा दाह आणि सायंकाळच्या वेळी तापमानातील घट पाहता गारठा जाणवत आहे. दिवसभरात साधारण तीन वेगळ्या स्थितींमधील या हवामानामुळं राज्यात सध्या आजारपणाचं सावटही पाहायला मिळत आहे. (Maharashtra Weather)
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यातील तापमानाच चढ-उतार अपेक्षित असून, मध्य महाराष्ट्रासह कोकण किनारपट्टी क्षेत्रावर याचा परिणाम दिसून येणार आहे. उत्तर भारतातील मैदानी क्षेत्रांध्ये तापमानाच वाढ झाल्यानं इथं थंडीचा कडाका कमी झाला आहे. ज्यामुळं इथून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग मंदावल्यामुळं महाराष्ट्रातील तापमानवाढ पाहायला मिळाली. (Maharashtra Weather)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community