किमान तापमानात घट झाल्याने राज्यात पुन्हा गारठा वाढला आहे. मात्र अद्यापही थंडी कमीच आहे. आज (२२ जाने.) कोकण, मध्य महाराष्ट्र (Maharashtra) आणि मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान होण्याचा अंदाज आहे. किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे. (Maharashtra Weather)
गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील तापमान 1 ते 3 अंशांनी वाढले आहे. तर बहुतांश मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 11 ते 20 अंशापर्यंत गेल्याची नोंद झाली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात येत्या 3 – 4 दिवसात किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अंशांची वाढ होणार आहे. त्यानंतर हळूहळू तापमान पुन्हा कमी होईल. विदर्भात पुढील 48 तास तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यानंतर 2 ते 3 अंशांनी किमान तापमानाचा पारा वाढेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे. (Maharashtra Weather)
हवामान अंदाज काय?
सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती उत्तर पाकिस्तानासह पश्चिम राजस्थान परिसरात आहे. पश्चिमी चक्रवाताचा सक्रिय प्रभाव असल्याने पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय राहणार आहे. किमान तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Maharashtra Temperature)
तापमानाचा पारा किती ?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्रात किमान तापमान 10° ते 19 अंशापर्यंत जाऊन पोहोचलं आहे. मंगळवारी पुण्यात बहुतांश ठिकाणी 12 ते 15 अंश सेल्सिअसची नोंद झाली. नाशिक मध्ये 15.3°, कोल्हापुरात 16 अंश, नगर 11.4°, सातारा 16.2, सोलापूर 16.5 अंशांवर गेले होते. मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तापमान 14 ते 17 अंशांच्या दरम्यान राहिले. विदर्भात मात्र किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला होता. भंडारा गोंदिया, नागपूर जिल्ह्यात 10 ते 13 अंश सेल्सिअस ची नोंद झाली. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमान वाढ झाली होती. (Maharashtra Weather)