उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांनी (Maharashtra Weather) पुन्हा एकदा वेग पकडला आहे. याचा परिणाम म्हणून राज्यासह मुंबईच्या (Mumbai) किमान तापमानाचा पारा खाली आला आहे. राज्यातील अनेक शहरांचे किमान तापमान ११ अंश, तर मुंबईचे किमान तापमान १६ अंश नोंदविण्यात आले असून, पुढील तीन दिवस थंडी कायम राहील, अशी शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. (Maharashtra Weather)
३ जानेवारी रोजी मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले होते, तर ८ वर्षांपूर्वी २०१६ साली जानेवारी महिन्यात मुंबईचे कमाल तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले होते. दरम्यानच्या काळात कमाल तापमान ३४ ते ३५ होते. त्यानंतर ८ वर्षांनी हिवाळ्यात जानेवारीत पारा पुन्हा ३६ नोंदविण्यात आला. रात्री थंड वारे वाहत आहेत. दिवसा पूर्वेकडून गरम वारे वाहत आहेत. त्यामुळे दिवसाचे तापमान अधिक आहे, तर रात्रीचे तापमान कमी आहे. (Maharashtra Weather)
हेही वाचा-Veer Savarkar: स्वार्थी खुलासे करण्याऐवजी सावरकरांचे साहित्यातील स्थान समजून घ्या!
दरम्यान, मध्य महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात 10 अंशांच्या खाली तापमान जात असल्याच्या नोंदी होत आहेत. शनिवारी यवतमाळ जिल्ह्यात 7.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर, सांगली, पुण्यातील हवेली, तसेच गोंदिया आणि नगर जिल्ह्यात किमान तापमान 8 अंशांवर गेल्याची नोंद झाली. इतर भागात साधारण 10 ते 12 अंशांची नोंद झाली. (Maharashtra Weather)
येत्या 3 दिवसांत कसं राहणार तापमान?
मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी तापमानाचा पारा घटनाचे चित्र आहे. अनेक भागांमध्ये 10 अंशाच्या खाली तापमान गेलंय. राज्यातील कमाल तापमानही 2 ते 3 अंशांनी घसरणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 4 ते 5 दिवसात हळूहळू दोन ते तीन अंशांनी कमाल तापमान हे घसरणार आहे. तर किमान तापमान पुढील 3 दिवसात दोन ते तीन अंशांनी घसरेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.गेल्या आठवड्यात किमान तापमानाचा पारा 15 ते 20 अंशावर गेला असल्यानं नागरिक उकाड्याने आणि घामाच्या धारांनी हैराण झाले होते. आता पुन्हा एकदा थंडीला पोषक वातावरण तयार झालंय. येत्या दोन ते तीन दिवसात हळूहळू तापमान कमी होणार असून गारठा वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community