दिल्लीमध्ये मंगळवारी पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह सुरू झालेल्या पावसामुळे दिल्लीतील वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. संपूर्ण देशभरातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहे.
( हेही वाचा : “हे राऊत, फाऊद, दाऊद यांना…” पंतप्रधानांचा अवमान केल्याप्रकरणी फडणवीसांचे राऊतांवर टीकास्त्र!)
राज्यात अवकाळी पावसाचे संकट
महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ७ एप्रिलपर्यंत राज्यातील विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान ४ एप्रिलला विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडल्यास यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची शेतातील काही अर्धवट कामे राहिली असतील तर ती कामे उरकून घ्यावीत आणि काढलेल्या पिकांची योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
दिल्लीत अलर्ट जारी
तसेच मंगळवार ४ एप्रिल रोजी दिल्ली, एनसीआर, गन्नोर, रोहतक, भिवानी, बरौत, शिकारपूर, खुर्जासह लगतच्या भागात हलका ते मध्यम पाऊस आणि वादळाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Join Our WhatsApp Community