पुढचे २४ तास महत्त्वाचे! राज्यात अवकाळी पावसाला सुरूवात, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

ऐन उन्हाळ्यात राज्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे असणार आहेत, येत्या ३ ते ४ तासांमध्ये संपूर्ण उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तवला आहे.

( हेही वाचा : मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या लागल्या रांगा )

राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावेल असा इशारा आधीच हवामान खात्याकडून देण्यात आला होता. यापूर्वीच राज्यात १५ मार्च ते १८ मार्चपर्यंत राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान मुंबई उपनगरातील दहिसर, बोरिवली परिसरात बुधवारी रात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे तर ठाणे, दिवा, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरात गुरूवारी सकाळपासून पावसाला सुरूवात झाली आहे.

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार १६ मार्चला राज्यातील ४ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here