गेल्या काही दिवसांपासून थंडीचा (Maharashtra Weather) जोर ओसरला आहे. तापमानात चढउतार होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आता उत्तरेतील राज्यांमध्ये कोरड्या वाऱ्यांचा प्रवाह आणि थंडीची लाट असल्याने राज्यात पुन्हा एकदा थंडीला पोषक वातावरण तयार होत आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत असल्याने दक्षिणेत तुफान पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Weather)
हेही वाचा-महाकुंभमध्ये आता ‘शाही’ नव्हे ‘अमृत’ स्नान; Yogi Adityanath यांनी केली घोषणा
भारतीय हवामान विभागानं (IMD) नव्या वर्षात (New Year Weather) उत्तर भारतात थंडीची लाट आणि दाट धुकं राहणार असल्याचा इशारा दिला आहे. 2 जानेवारीपर्यंत पंजाब हरियाणा, झारखंड, हिमाचल प्रदेशासह जम्मू काश्मीरमध्ये तापमान 3 ते 5 अंशांनी घटणार असल्याचं सांगितलंय. दरम्यान, जम्मू काश्मीर खोऱ्यात ‘चिल्लई कलान’ असल्याचं सांगितल्यानंतर काश्मीरचं तापमान उणे 8.5 अंश सेल्सियसवर पोहोचल्याची नोंद झाली. यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात थंड रात्रीची नोंद तिथे झाली. हवामान विभागाच्या मते मध्य भारतात किमान तापमानाचा पारा येत्या आठवड्यात घसरणार असून 2-4 अंशांनी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. (Maharashtra Weather)
हेही वाचा-नववर्षानिमित्त बुधवार पहाटे ३ वाजल्यापासून Shri Siddhivinayak दर्शन सुरू होणार
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अहवालानुसार, राज्यभरात येत्या पाच दिवसात तापमानात मोठे बदल होणार नसले तरी येत्या 3-4 दिवसात किमान तापमान घसरण्याची शक्यता आहे. कमाल तापमान येत्या 24 तासांत 2-3 अंशांनी वाढणार असून हवामान कोरडं राहणार आहे. विदर्भात येत्या पाच दिवसात फारसा बदल होणार नसल्याचंही हवामान विभागानं वर्तवलंय. येतया दोन दिवसात हळूहळू किमान तापमान घटेल असंही सांगण्यात आलं आहे. (Maharashtra Weather)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community