राज्यात पुढचे दोन दिवस काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि घाटात जोरदार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओरिसा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने मागील दोन दिवसांपासून राज्यातील विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा हा 20 डिग्री नॉर्थला असून सामान्य परिस्थितीपेक्षा दक्षिणेकडे झुकलेला आहे. उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओरिसा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात पाऊस पडत असून पुढील दोन दिवस राज्यातील कोकण, गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात घाट विभागात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.
(हेही वाचा Chandrayaan 3 : चांद्रयान ३ कुठवर पोहचले? चंद्राच्या दिशेने कधी प्रवास सुरु करणार? )
22 ते 24 जुलै दरम्यान अतीवृष्टीचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण गोवा याठिकाणी पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर, गोवा महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसायट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community