मुंबईसह राज्यभरात मंगळवारी हवामानात (Maharashtra Weather) झालेले बदल बुधवारीही कायम होते. त्यात आता पुढील चार ते पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे. तर मुंबईत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी हवामानात बदल झाला, तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले. (Maharashtra Weather)
राज्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. त्यातच दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी अनेक भागांमध्ये गारपिटीने देखील झोडपले. सातारा, सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या गारपिट आणि अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर या बदलत्या हवामानाचा नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनाही मोठा फटका बसला आहे. द्राक्षांच्या दरात प्रति किलो 20 रुपयांची घसरण झाली आहे. (Maharashtra Weather)
हेही वाचा- Mhada च्या वसाहतीतही ‘आपला दवाखाना’; वैद्यकीय सुविधेसाठी प्राधिकरणाचा पुढाकार
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल पिंपळनेर दरम्यान दुपारी 2:45 दरम्यान अवकाळी पावसासह गारपीट झाली. या गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सकाळपासूनच वातावरणामध्ये उकाडा जाणवत होता, परंतु अवकाळी पावसाने काहीसा गारवा निर्माण केला आहे. मात्र तुरळक प्रमाणामध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी गहू कापून शेतात ठेवला होता. त्याचे देखील नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. अर्धा तास झालेला पावसाने शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. (Maharashtra Weather)
10 जिल्ह्यांना हाय अलर्ट
दरम्यान, हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, पुणे, सातारा, अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित भागामध्ये हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Weather)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community