
राज्यात (Maharashtra Weather) बहुतांश ठिकाणी उन्हाचा पारा चढत आहे. देशातील हवामान सतत बदलत आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या प्रत्यवर्ती चक्रीवादळामुळे राज्यात काही भागांत 2 दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच राज्यात येत्या तीन दिवसांत तापमान वाढणार असून उन्हाचा तडाखा कायम राहणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. (Maharashtra Weather)
हेही वाचा-QR Code स्कॅन करताच तक्रार दाखल होणार ; 24 तासांत घेतली जाईल दखल
काल (19 फेब्रु.) रात्री उशिरापासून दिल्ली (Delhi), नोएडा आणि एनसीआरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे देशातील अनेक राज्यांत पावसाची शक्यता आहे. 23 फेब्रुवारीपर्यंत उत्तर भारतातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. (Maharashtra Weather)
मुंबई, नाशिक, पुणे, संभाजीनगर, अमरावती, यवतमाळसह काही जिल्ह्यांत तापमानात सरासरीपेक्षा 2 ते 4 अंशांनी वाढ झाली आहे. उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्रात पोहोचू न शकल्याने रात्रीच्या थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे राज्यातील उच्चतम तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत असून उष्णतेपासून बचाव करण्याचा, तसेच योग्य काळजी घेण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे. (Maharashtra Weather)
हेही वाचा-Maha kumbh मध्ये कोट्यवधींच्या उलाढालीने अर्थव्यवस्थेला मोठी गती; उद्योग महासंघाचा दावा काय ?
हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारीपर्यंत देशातील अनेक भागात पावसाचा इशारा दिला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर बंगालच्या उपसागरात प्रत्यवर्ती चक्रीवादळ तयार होत आहे. त्यामुळे गंगेच्या मैदानी भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या गंगा मैदानात 23 फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहार आणि झारखंडमध्ये 20, 22 आणि 23 फेब्रुवारीला पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, ओडिशामध्ये 23 फेब्रुवारीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community