हवामान विभागानं (Maharashtra Weather ) दिलेल्या अंदाजानुसार, नव्या वर्षाची सुरुवात गुलाबी थंडीनं होणार असून राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण (Konkan) , मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात येत्या चार ते पाच दिवसात 1-2 अंशांनी वाढ होणार असून किमान तापमान 2-4 अंश सेल्सियसने कमी होणार आहे. विदर्भात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही. तर किमान तापमानात येत्या 24 तासांत 4-5 अंशांनी घट होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Maharashtra Weather )
अरबी समुद्रात वाढलेल्या आर्द्रतेमुळं राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. आता चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या उत्तर प्रदेश आणि परिसरात आहे. उत्तरेकडील राज्यात दाट धुकं आणि थंडीची लाट (Cold Temperature) आहे. परिणामी राज्यात कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह सक्रीय होणार आहेत. (Maharashtra Weather )
हेही वाचा-रेल्वेकडून 2024 वर्षात 6450 किमी Railway Track चे नूतनीकरण
येत्या चार ते पाच दिवसात राज्यात पुन्हा किमान तापमानात घटणार आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात 2-4 अंश सेल्सियसने तापमान घसरणार आहे. येत्या पाच दिवसात विदर्भात कमाल तापमानात फारसा परिणाम जाणवणार नाही. येत्या चार दिवसात राज्यात पुन्हा थंडी जाणवायला लागणार असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्रानं सांगितलं आहे. (Maharashtra Weather )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community