Maharashtra Weather News: मुंबईत गारठा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो वाचा

78
Maharashtra Weather News: मुंबईत गारठा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो वाचा
Maharashtra Weather News: मुंबईत गारठा वाढणार; हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो वाचा

राज्यात पुन्हा एकदा गारठा (Maharashtra Weather News) वाढला आहे. उत्तरेकडील थंडीच्या (Cold Weather) वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाल्याने थंडीचा कडका वाढला आहे. त्यामुळं राज्यात दोन दिवस गारठा कामय राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात गारठा कायम असला तरी तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. राज्यातही त्याचा परिणाम दिसून येत आहे. (Maharashtra Weather News)

हेही वाचा-Siddhivinayak मंदिरातील विश्वस्तांचा कार्यकाळ २ वर्षांनी वाढणार!

मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि आसपासच्या परिसरात सोमवारची (१६ डिसेंबर) पहाट सर्वाधिक थंडी होती. हा गारठा पुढील 2 ते 3 दिवस कायम राहणार असल्याची माहिती बदलापूरमधील हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यात गारठा वाढला असून सोमवारी पहाटे बदलापूर शहरात 10.4 अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. (Maharashtra Weather News)

हेही वाचा-Bangladesh वर आर्थिक बहिष्कार टाकला पाहिजे; वीरमाता अनुराधा गोरे यांची रोखठोक भूमिका

बदलापूर शहरातील हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी त्यांच्या खासगी स्वयंचलित हवामान केंद्रात ही नोंद केली आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे बदलापूर शहरात आधी पोहोचत असून ते इकडून मुंबईच्या दिशेने वाहत जातात. त्यामुळे बदलापूर शहरात कमी तापमानाची नोंद होते आणि त्यापुढे अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यामार्गे मुंबईत हे तापमान वाढत जातं, अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली. (Maharashtra Weather News)

हेही वाचा-Pink E-Rickshaw Scheme : महिलांना ‘पिंक ई-रिक्षा’साठी मिळणार अनुदान; कसा कराल अर्ज?

त्यामुळे मुंबईत सोमवारी पहाटे 14 अंश तापमानाची नोंद झाली. आता हा गारवा पुढील काही दिवस कायम राहील आणि जानेवारी महिन्यात आणखी 2 ते 3 अंशांनी तापमान घसरून मुंबई-ठाण्यात एक आकडी तापमानाची नोंद होईल, असा अंदाज मोडक यांनी व्यक्त केला. (Maharashtra Weather News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.