अवकाळी पावसाला पोषक स्थिती तयार झाल्याने काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाचा (Maharashtra Weather) इशारा देण्यात आला होता. मध्य महाराष्ट्रातील (Madhya Maharashtra) काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागानं (IMD forecast) वर्तवली आहे. दरम्यान, राज्यात वातावरण (Temperature) कोरडे होण्यास सुरुवात होणार असून काही भागात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस हजेरी लावणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. आज (२९ डिसेंबर) राज्यात वातावरण काहीसे ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. (Maharashtra Weather)
हेही वाचा-सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांमध्ये गतीसह गुणवत्ता राखा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती पंजाब (Punjab) आणि आजुबाजूच्या परिसरात स्थिरावली आहे. अरबी समुद्रात असणारा चक्राकार वाऱ्यांचा पट्टा पुढे सरकला असून उत्तर कोकण भागात आहे.परिणामी कोकण किनारपट्टीवर आर्द्रता वाढली आहे. तसेच दुसरीकडे वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत असून हिमालयीन भागात हलक्या पावसासह बर्फ पडण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे 30 डिसेंबरपासून पुन्हा थंडीमध्ये वाढ होण्यास सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. गेले दोन दिवस राज्यात ढगाळ वातावरण आहे. आज कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आला नसला तरी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather)
हेही वाचा-पुण्यातून धावणार दोन ऐवजी सहा Vande Bharat Express; असा असेल मार्ग
येत्या दोन दिवसात राज्याच्या हवामानात मोठे बदल होणार असून पावसाचा इफेक्ट ओसरणार आहे. रविवारी काही भागात हलक्या पावसाची शक्यता असून वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी येत्या दोन दिवसात हवेतील कोरडेपणा वाढणार आहे. पुन्हा एकदा गुलाबी थंडी पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. (Maharashtra Weather)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community