Maharashtra Weather : राज्यात तापमान घसरले ! सर्वत्र धुक्याची चादर, वाचा IMD चा सविस्तर अंदाज

29
Maharashtra Weather : राज्यात तापमान घसरले ! सर्वत्र धुक्याची चादर, वाचा IMD चा सविस्तर अंदाज
Maharashtra Weather : राज्यात तापमान घसरले ! सर्वत्र धुक्याची चादर, वाचा IMD चा सविस्तर अंदाज

मागच्या दोन दिवसांपासून राज्यातील तापमानाचा पारा (Maharashtra Weather) घसरला आहे. थंडीची (Winter) लाट राज्यभर पसरली आहे. फेंगल वादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा थंडी वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव जिल्ह्यात हंगामातील सर्वांत कमी ८ अंशाची नोंद करण्यात आली आहे. तर नाशिकमध्ये (Nashik) थंडीचा पारा घसरलेलाच आहे. मागच्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. (Maharashtra Weather)

हेही वाचा- Brain Tumor च्या उपचारासाठी पालकांनी मुलीला नेले चर्चमध्ये; अंधश्रद्धेपोटी ४० दिवस चाललेल्या संघर्षानंतर मृत्यू

राज्यात अनेक भागात किमान तापमान 10 अंशांच्या खाली पोहोचले. उत्तर महाराष्ट्रात तर तापमान 4-5 अंशावर पोहोचले होते. मुंबईकरांना (Mumbai) 9 वर्षांनंतर सर्वात कमी तापमानाची नोंद झाल्यानं हुडहुडी भरली होती. पण आता भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक केंद्राने दिलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहणार असून हवामान कोरडेच राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या चार ते पाच दिवसात थंडीचा कडाका काहीसा कमी होऊन किमान तापमानात हळूहळू 2-3 अंशांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather)

हेही वाचा-संभल, अजमेरनंतर आता Atala Masjid वर होणार सुनावणी ; देवीचे मंदिर असल्याचा हिंदूंचा दावा

हवामान विभागानं (IMD) उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या थंडीच्या लाटेचा इशारा दिलाय. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये 11 ते 13 डिसेंबरपर्यंत हाडं गोठवणारी थंडी राहणार आहे. उत्तराखंडमध्ये तर जमीन गोठणार असल्याचं सांगण्यात आलंय. पण त्याचवेळी दक्षिणेकडे पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा विकसित होत असून केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेशात तुफान पावसाचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान, महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहणार असून हवामान कोरडेच राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमान येत्या दोन दिवसात एक ते दोन अंशांनी वाढण्याचा अंदाज भारतीय प्रादेशिक हवामान केंद्रानं दिला आहे. (Maharashtra Weather)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.