राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा (Maharashtra Weather) पारा 35-39 अंश सेल्सियस एवढा गेलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, (IMD Forecast) देशात सोलापुरात (Solapur) तापमानाचा पारा सर्वाधिक 39.4 अंश सेल्सियस एवढा नोंदवला गेला. मंगळवारी (4 मार्च) दक्षिण मध्य महाराष्ट्रात (South Madhya Maharashtra) हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे मध्य महाराष्ट्रात अनेक भागात मंगळवारी ढगाळ वातावरण होतं. कमाल तापमानात काहीसा दिलासा मिळाला असला तरी तापमान चढेच असल्याचे दिसले. (Maharashtra Weather)
महाराष्ट्र तापलाय
गेल्या 24 तासांत 2-5 अंश सेल्सियसने तापमानात घट झाली होती. मात्र विदर्भ मराठवाड्यात तापमानात 1-2 अंशांनी वाढ झाल्याची नोंद झालीय.मराठवाडा आणि विदर्भात तापमानाचा पारा (Maharashtra Weather) चढाच राहणार असून मध्य महाराष्ट्र ही तापलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्या जम्मू काश्मिर, लडाख, हिमाचल प्रदेशात तुफान पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर इशान्येकडील भागातही पावसाची शक्यता आहे. कोकणपट्ट्यात प्रचंड उष्ण आणि दमट हवामानाची नोंद होत असून उर्वरित महाराष्ट्रात शुष्क व कोरडे हवामान आहे. (Maharashtra Weather)
राज्यातील तापमान
अहमदनगर – 35.8°C, अकोला – 38.6°C, अमरावती – 36.8°C, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – 37.0°C, बीड – 35.5°C, बुलढाणा – 35.0°C, चंद्रपूर – 38.0°C, गडचिरोली – 37.2°C, गोंदिया – 35.8°C, जळगाव – 36.0°C, कोल्हापूर – (दिसत नाही), लातूर – 36.0°C, मुंबई शहर – 31.8°C, मुंबई उपनगर – 35.3°C, नागपूर – 36.9°C, नाशिक – 36.3°C, उस्मानाबाद – 35.8°C, पालघर – 33.1°C, परभणी – 38.0°C, पुणे – 37.7°C, रायगड – 34.4°C, रत्नागिरी – 31.7°C, सांगली – 37.9°C, सातारा – 37.5°C, सोलापूर – 38.9°C, ठाणे – 36.0°C, वर्धा – 37.7°C, वाशीम – 35.4°C, यवतमाळ – 37.0°C. (Maharashtra Weather)
हेही वाचा-रेल्वे प्रवाशांची पायपीट होणार कमी; राज्य शासनाने चार नवीन Police Stations ना दिली मान्यता
वातावरणातून थंडी गायब झाली आहे. सकाळच्या सुमारास वातावरणात गार हवा जाणवत आहे. त्यानंतर सकाळी 10 पासूनच उन्हाचा चटका बसण्यास सुरुवात होऊ लागली आहे. (Maharashtra Weather)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community