राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा (Maharashtra Weather) जोर वाढताना दिसून येत आहे. शनिवारी राज्याच्या किमान तापमानाचा पारा 10 ते 12 अंशांवर खाली आला. त्यामुळे कोकण वगळता अवघ्या राज्यात थंडीची लाट तीव्र झाली आहे. शनिवारी राज्यातील सर्वात कमी तापमान धुळ्यात (Dhule) नोंदवण्यात आले. या ठिकाणी 4.4 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी जळगाव 8.4, अहिल्यानगर 8.7, पुणे 8.8, नाशिक 9.2, छत्रपती संभाजीनगर 9.8 अंश इतके तापमान नोंदवले गेले. राज्यात आगामी दोन दिवस थंडीचा (Cold) कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Maharashtra Weather)
राज्यातील किमान तापमानात गत 24 तासांत 2 ते 4 अंशांनी घट झाली. उत्तेरकडील थंड वाऱ्यांचा जोर वाढल्याने राज्यात गारठा वाढला आहे. प्रामुख्याने राजस्थान व मध्य प्रदेशात थंडीची लाट तीव्र आहे. भोपाळचा पारा यंदा प्रथमच 3.8 अंशांपर्यंत खाली आल्याने तिकडून विदर्भामार्गे राज्यात थंडीची लाट तीव्र झाली आहे. विदर्भ, मध्य व उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या किमान तापमानात दररोज घट होत असून काही शहरांचा पारा 8 अंशांपर्यंत खाली आला आहे. धुळ्यासह मध्य महाराष्ट्रातील निफाड, जळगाव, अहिल्यानगर, जेऊर, नाशिक, मालेगाव, मराठवाड्यातील परभणी, विदर्भातील गोंदिया, वर्धा, नागपूर येथे तापमान 10 अंशांच्या खाली गेल्याची नोंद करण्यात आली आहे. (Maharashtra Weather)
हेही वाचा-ED raids; मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची कारवाई; १३० कोटींची मालमत्ता जप्त
मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह राजस्थान, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, काश्मीर, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, लडाख अशा 11 राज्यांमध्ये शनिवारी थंडीची लाट उसळली होती. या राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 5 अंशांच्या खाली गेला होता. राजस्थानातील सीकर आणि माउंट अबूमध्ये गेल्या 3 दिवसांपासून पारा 0 अंशांवर आहे. शनिवारीही हीच स्थिती होती. मध्य प्रदेशातील 25 हून अधिक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट होती. श्रीनगरमध्ये शनिवारी उणे 3 अंश तापमानाची नोंद झाली.पश्चिम-उत्तर भारतात 12.6 किमी उंचीवर ताशी 278 किमी वेगाने गार वारे वाहत आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय असल्याने बर्फ वितळत आहे. त्यामुळे उत्तर आणि मध्य भारतात थंडी वाढते आहे. थंडीची ही लाट 17 डिसेंबरपर्यंत राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Maharashtra Weather)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community