मुंबई आणि कोकणात पुढील ४८ तासांमध्ये उकाडा (Maharashtra Weather Today) आणखी तीव्र होणार असून, उष्णतेची लाट येणार आहे. शहरातील काही भागांमध्ये सूर्याचा प्रकोप अंगाची काहिली (Maharashtra Weather Today) करताना दिसेल, तर कोकण किनारपट्टी भागात मूळ तापमानाहून (Maharashtra Weather Today) अधिक दाह जाणवेल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यावर मात्र गारपीट आणि अवकाळी पावसाचं सावट कायम असून, काही क्षेत्रांमध्ये पावसाचं वादळी रुप पाहायला मिळणार आहे. (Maharashtra Weather Today)
वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट
अमरावती, वर्धा, नागपूर आणि यवतमाळ येथे गारपीट आणि ताशी ४० ते ५० किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाने इथे नागरिकांना शक्यतो घराबाहेर पडणं टाळण्याचं आवाहन केलं आहे. (Maharashtra Weather Today) मंगळवारी (२२एप्रिल) सायंकाळच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान गारपीट झाली. शेगाव, खामगाव, बुलढाणा तालुक्यासह आजूबाजूच्या परिसराला अवकाळी पावसाने अक्षरशः झोपडून काढलं. (Maharashtra Weather Today)
सर्वसामान्य नागरिकही हवालदिल
यामुळे पिकं उध्वस्त झाली तर, घर संसार उघड्यावर पडले. अनेक ठिकाणी अजूनही खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत झालेला नाही. गारपीट, अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने या भागात मोठं नुकसान झाल्यामुळे बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिकही हवालदिल झाले. (Maharashtra Weather Today)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community