Maharashtra Weather: राज्यासह देशात ऊन-पावसाचा खेळ सुरूच राहणार? IMD चा अंदाज काय सांगतो?

158
Maharashtra Weather: राज्यासह देशात ऊन-पावसाचा खेळ सुरूच राहणार? IMD चा अंदाज काय सांगतो?
Maharashtra Weather: राज्यासह देशात ऊन-पावसाचा खेळ सुरूच राहणार? IMD चा अंदाज काय सांगतो?

राज्यासह देशात सध्या ऊन-पावसाचा खेळ (Maharashtra Weather) पाहायला मिळत आहे. कुठे उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. तर कुठे अवकाळी पावसाचा तडाखा बसताना दिसत आहे. पुढील काही दिवस महाराष्ट्रात काही भागात जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. कोकण, मराठवाड्यासह विदर्भात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. या व्यतिरिक्त इतर भागात उष्णतेच्या झळा बसण्याची शक्यता असून काही ठिकाणी तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअस वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. (Maharashtra Weather)

(हेही वाचा –Election Commission : मतदानाची टक्केवारी)

दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा पाहायला मिळणार असून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather)

‘रेमल’ चक्रीवादळ

‘रेमल’ चक्रीवादळ रविवारी (२६ मे) सायंकाळी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनाऱ्यावर धडकेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. परिणामी, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील जिल्हे, उत्तर ओडिशा, मिझोराम, त्रिपुरा आणि मणिपूरच्या दक्षिणेकडील भागात २६ आणि २७ मे रोजी मुसळधार पावसाचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. पूर्वमोसमी हंगामातील हे पहिले चक्रीवादळ आहे. ते १०२ किलोमीटर प्रती तास या वेगाने धडकेल, असे हवामान विभागातील शास्त्रज्ञ मोनिका शर्मा यांनी म्हटले आहे. (Maharashtra Weather)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.