Maharashtra Weather: महाराष्ट्रात येत्या ३-४ तासांत कोसळणार मुसळधार पाऊस? मुंबईत ढगाळ वातावरण

8969
Maharashtra Weather: महाराष्ट्रात येत्या ३-४ तासांत कोसळणार मुसळधार पाऊस? मुंबईत ढगाळ वातावरण
Maharashtra Weather: महाराष्ट्रात येत्या ३-४ तासांत कोसळणार मुसळधार पाऊस? मुंबईत ढगाळ वातावरण

राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस (Maharashtra Weather) कोसळणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. येत्या ३-४ तासांत अहमदनगर, जळगाव, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather)

नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल

मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता पुढे सरकण्यास सुरुवात झाली आहे. येत्या २४ तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्रासह मालदीवच्या काही भागात मान्सूनचा प्रभाव जाणवू शकतो. दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान आणि निकोबार बेटांतील काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून (Monsoon) पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आज (२२ मे) आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज आहे. (Maharashtra Weather)

जळगाव येथे सर्वाधिक तापमानाची नोंद

मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होत आहे. कुठे अवकाळी पावसाच्या (Unseasonal rain) सरी, तर कुठे तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे. मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमधील तापमानात पुन्हा एकदा मोठी वाढ आहे. मंगळवारी (२१ मे) जळगाव येथे सर्वाधिक तापमानाची ४३.९ सेल्सिअस नोंद झाली. दुसरीकडे दक्षिण कोंकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ताशी ३०-४० किमी वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.