Maharashtra Weather : येत्या काही दिवसांत गारपिटीसह अवकाळीचे संकट ? वाचा IMDचा अंदाज …

58
Maharashtra Weather : येत्या काही दिवसांत गारपिटीसह अवकाळीचे संकट ? वाचा IMDचा अंदाज ...
Maharashtra Weather : येत्या काही दिवसांत गारपिटीसह अवकाळीचे संकट ? वाचा IMDचा अंदाज ...

गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा कहर (Maharashtra Weather) जाणवु लागला आहे. उन्हाचा चटका असह्य झाला आहे. संपूर्ण विदर्भात 40 अंशांच्या पुढे तापमान गेल्याने धडकी भरेल एवढं तापमान नोंदवलं जात आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही कमाल तापमानाचा पारा 38- 40 अंशानदरम्यान आहे. दरम्यान भारतीय हवामान केंद्राने गुढीपाडव्यापासून आता संपूर्ण राज्यभर अवकाळी पावसाचे इशारे दिले आहेत. (Maharashtra Weather)

हेही वाचा-महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी उंच आणि डौलाने उभारूया ; Eknath Shinde

दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून अवकाळी पावसाला आजपासून सुरुवात होणार आहे. मार्चच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 मार्चला ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. येलो अलर्ट नसला तरी पुण्यासह मध्य महाराष्ट्र कोकण व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याबाबत पुणे IMD वेधशाळेचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी Xपोस्ट केली आहे. (Maharashtra Weather)

1 एप्रिलला विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय. 2 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रला अवकाळी पाऊस झोडपणार आहे. हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव सध्या छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांवर आहे. या चकरावाताचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या अंदमान समुद्रासह आजूबाजूच्या परिसरात कायम आहे परिणामी महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.