रविवारी ( १२ नोव्हेंबर) लक्ष्मी पुजनाच्या मुहूर्तावरही राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, कोकण, पुणे, सातारा या ठिकाणी काही भागात शनिवारीही पाऊस झाला, तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. (Weather Update )
(हेही वाचा : High Court order : रात्री १२ नंतरही फटाके फ़ुटलेच)
राज्यात काही ठिकाणी आद्रता वाढल्याने मोठ्या प्रमाणात ढगाळ हवामान आहे. शुक्रवारी आणि शनिवारी राज्यात काही जिल्ह्यात पाऊस पडला होता. पुण्यासह कोकण, सातारा येथेही पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मुंबई आणि ठाण्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तर काही भागात ढगाळ वातावरण होते. दरम्यान, आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देखील पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यासह देशातील काही भागात देखील आज पाऊस होण्याची शक्यता आहे. गोवा, केरळ, तामिळनाडूसह राजधानी दिल्लीमध्येही पाऊस झाला. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मान्सून अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने देशासह राज्यात पाऊस होत असल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community