राज्यात पुढील दोन ते तीन दिवस थंडी वाढणार असून हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, पुणे, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरण्याचा अंदाज आहे. नाताळच्या दरम्यान महाराष्ट्रातील तापमान वाढण्याचा अंदाज आहे. बुधावर आणि गुरुवारी राज्यातील कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असून त्यानंतर राज्यातील तापमान वाढणार असल्याच हवामान विभागाचे म्हणणे आहे. (Maharashtra weather update)
नाताळनंतर थंडी वाढणार
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे बुधवारी आणि गुरुवारी राज्यात थंडीचा जोर वाढणार आहे. दोन दिवसानंतर मात्र राज्यातील तापमान वाढ होणार आहे. नाताळच्या दरम्यान रजेत उबदार वातावरण पाहायला मिळेल आणि थंडी कमी झाली असेल. राज्यात २८ डिसेंबर राज्यातील गारठा वाढण्याचे अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra weather update)
(हेही वाचा : QR Code on Hording : राज्यातील प्रत्येक होर्डिंगवर क्युआर कोड लावा; उच्च न्यायालयाचे राज्यसरकारला आदेश )
देशात कुठे पाऊस तर कुठे थंडीची लाट
देशात कुठे पाऊस तर कुठे थंडीची लाट पाहायला मिळत आहे. तामिळनाडूच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर परिरस्थितीमुळे रेल्वे सेवेसह राज्यातील दळणवळण सेवाही विस्कळीत झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community