Maharashtra Weather : वातावरणातला गारठा वाढणार; राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?

60
Maharashtra Weather : वातावरणातला गारठा वाढणार; राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
Maharashtra Weather : वातावरणातला गारठा वाढणार; राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पहाटे हलका गारवा (Maharashtra Weather) आणि दुपारी घामाच्या धारांसह प्रचंड उकाड्याला नागरिक सामोरं जातायत. गेल्या आठवड्यात कमाल तापमान 35 अंशांपर्यंत जाऊन ठेपलं होतं. मागील दोन दिवसांपासून पहाटेचा गारवा वाढलाय. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. आता कमाल आणि किमान तापमानात आजपासून 2-3 अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं (weather department) दिला आहे. (Maharashtra Weather)

हेही वाचा-२०२५ ची सुरुवात भाजपा दिल्लीच्या विजयाने करेल; केंद्रीय मंत्री Amit Shah यांचे विधान

हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत असून पंजाब व परिसरात सक्रीय आहे. उत्तरेत पश्चिमेकडील वाऱ्यांचे झोत येत आहेत. त्यामुळे थंडी कमी अधिक होत असून जमिनीलगत दाट धुक्याचं साम्राज्य तयार झाले आहे. उत्तरेकडील बदललेल्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून आता तापमानात येत्या तीन दिवसात घट होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Maharashtra Weather)

हेही वाचा-Maha Kumbh 2025 : भाविकांना मिळणार हायटेक सुविधा

प्रादेशिक हवामान केंद्राच्या अहवालानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात येत्या 4-5 दिवसांत हवामानात फारसा फरक नसेल. पण येत्या 48 तासांत किमान व कमाल तापमान 1-2 अंशांनी कमी होणार आहे. विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Weather)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.