Maharashtra Weather : येत्या पाच दिवसात तापमान कसं असणार ? वाचा IMD चा अंदाज काय?

82
Maharashtra Weather : येत्या पाच दिवसात तापमान कसं असणार ? वाचा IMD चा अंदाज काय?
Maharashtra Weather : येत्या पाच दिवसात तापमान कसं असणार ? वाचा IMD चा अंदाज काय?

मुंबईत शनिवारी (1 मार्च) रोजी कमाल तापमान (Maharashtra Weather) 35.5 एवढे होते. दक्षिण व उत्तर कोकणात साधारसा 31-36 अंश सेल्सियस कमाल तापमान नोंदवण्यात आले. सामान्य तापमानाहून अधिक तापमानाची नोंद बहुतांश ठिकाणी होत असून उत्तर व मध्य महाराष्ट्रात 34-38 अंशांची नोंद झाली. हवामान विभागाने उत्तरेकडील राज्यांना तीव्र पावसाचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather)

हेही वाचा-Delhi Pollution: दिल्लीत ‘या’ वाहनांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही; 31 मार्चपासून नियम लागू

IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या उत्तरप्रदेश आणि आजूबाजूच्या भागात तसेच मध्य महाराष्ट्राच्या मध्यभागात कायम आहे. परिणामी राज्यात कोकण आणि गोवा भागात येत्या दोन दिवसात प्रचंड उष्ण आणि दमट हवामान असेल, असं सांगण्यात येत आहे. उर्वरित भागात तापमानात फारसा बदल राहणार नसल्याचा अंदाज आहे. (Weather) दरम्यान कोकणात सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आलाय. उर्वरित ठिकाणी तापमान चढेच राहणार आहे.(IMD Forecast) (Maharashtra Weather)

हेही वाचा-Central Railway च्या मुंबई विभागाचा प्रवास झाला आधिक सुरक्षित आणि आरामदायी; काय आहेत सुविधा?

अकोला जिल्ह्यात राज्यातील उच्चांकी 38.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती, वर्धा, नागपूर आणि चंद्रपूरसारख्या विदर्भातील इतर जिल्ह्यांतही तापमान 35 अंशाच्या वर गेले आहे, त्यामुळे या भागात उन्हाचा तडाखा अधिक जाणवत आहे. मराठवाड्यातही उन्हाची तीव्रता जाणवते. नांदेड, लातूर आणि बीड येथे 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातही उन्हाची लाट जाणवत आहे. पुणे, सोलापूर आणि सातारा येथे तापमान सरासरीपेक्षा अधिक आहे. (Maharashtra Weather)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.