महिला पोलिसांना कामावरील जबाबदारीसोबतच घरातील जबाबदारी असते. आठ तासांपेक्षा अधिक ड्यूटी केल्याने त्यांची जबाबदारी आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याने, महिला पोलिसांवरचा मानसिक ताण वाढत आहे. ही दुहेरी भूमिका लक्षात घेऊन, पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस महिलांना आठ तासांची ड्यूटी देण्याचा आदेश दिला आहे.
महिला आयोगाच्या पाठिंब्याची गरज
या पार्श्वभूमीवर महिला पोलिसांना आठ तास ड्युटी करण्यासाठी महिला आयोगाचा पाठिंबा हवा, अशी मागणी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केली आहे. मात्र हा बदल घडवण्यास आपण एकटे पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यासाठी महिला आयोगानेही पाठपुरावा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. महिला पोलिसांची ८ तास ड्युटी करण्यासाठी मला महिला आयोगाचा पाठिंबा पाहिजे, मी एकटा पडतोय, अशी खंत संजय पांडे यांनी व्यक्त केली आहे.
( हेही वाचा :एडीआर अहवाल: भाजप सर्वात श्रीमंत पक्ष, तर काॅंग्रेसचे देणे बाकी आणि जाणून घ्या शिवसेना कुठे ? )
महिलांसाठी शौचालयही नाही
नायगाव पोलीस स्टेशनमध्ये तर महिलांसाठी शौचालय नाही, पोलीस स्टेशनमध्ये किमान एक महिला शौचालय असायला हवं, अशी मागणीही संजय पांडे यांनी केली आहे. दुसरा एक विषय आहे एकत्रीकरणाचा, नवरा सोलापूरमध्ये असतो, तर पत्नी नागपूरात त्यांना आपण एका ठिकाणी ड्युटी देऊ शकत नाही, याकडेही संजय पांडे यांनी लक्ष वेधलं आहे.