राज्यातील नागरिकांना तणावमुक्त (Mental Illness) करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी राज्य सरकारने ‘टेलिमानस’ हे कॉल सेंटर चालू केले होते. वर्ष २०१२ मध्ये हजारो तरुणांनी सर्वाधिक संपर्क यावर केले आहेत. त्यातही १८ ते ४५ वयोगटातील ७३.०५ टक्के तरुणांनी संपर्क करून त्यांच्या समस्या मांडल्या.
कोणत्या कारणामुळे तरुणाई आहे तणावात?
४६ ते ६४ वयोगटातील १६ टक्के नागरिकांनी येथे मानसिक तणावामुळे (Mental Illness) संपर्क केला. १३ ते १७ वयोगटातील ४.३ टक्के, १२ वर्षांखालील मुलांचे प्रमाण १.२ टक्के आणि ६५ वर्षांवरील नागरिकांचे संपर्क करण्याचे प्रमाण ४.९ टक्के इतके होते. आर्थिक विवंचनेसह बिघडलेले नातेसंबंध, कामातील ताणतणाव, जीवघेणी स्पर्धा, बेकारी आणि व्यसनाधीनता अशी अनेक कारणे तरुण तणावात (Mental Illness) असण्यामागे दिसून येत आहेत.
Join Our WhatsApp Community