मुंबईत शनिवारी महारोजगार मेळावा

148

मुंबईतील एलफिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये शनिवारी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यांमधील ७ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून इच्छुक उमेदवारांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

( हेही वाचा : मध्य रेल्वे कर्नाक उड्डाणपुलाचा उल्लेख असणाऱ्या शिळा जतन करणार! पहा फोटो )

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. पासून एलफिन्स्टन टेक्नीकल हायस्कूल, ३ महापालिका मार्ग, धोबी तलाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एरिया, फोर्ट, मुंबई येथे मेळाव्यास सुरुवात होईल.

मेळाव्यामध्ये मुंबई शहरातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच उद्योजकता मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे उद्घाटन मंत्री लोढा, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन. , मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह विविध उद्योजकांच्या उपस्थितीत होणार आहे.,

या कंपन्यांमध्ये संधी

मेळाव्यामध्ये बी.व्ही.जी. इंडिया लि., आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती, इम्पेरेटीव्ह इत्यादी उद्योग सहभागी होणार आहेत. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक, इंजिनीअरींग पदवी इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिंग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पीटीलिटी, एचआर अॅप्रेंटीसशीप, डोमॅस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया ऍण्ड एन्टरटेंमेंट अशा विविध क्षेत्रात एकूण ७ हजार पदे उपलब्ध आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.