Mahatma Phule Wada: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी, अजित पवार यांची माहिती

स्मारकासाठी आराखड्याच्या विविध पर्यायांवर विचार करून चांगला पर्याय निवडण्यात येईल.

151
Mahatma Phule Wada: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी, अजित पवार यांची माहिती
Mahatma Phule Wada: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी, अजित पवार यांची माहिती

महात्मा फुले वाडा (Mahatma Phule Wada) आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल. स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी, असे विधान अजित पवार यांन केले आहे.

राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा तसेच महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्ताराबाबत विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, स्मारकासाठी आराखड्याच्या विविध पर्यायांवर विचार करून चांगला पर्याय निवडण्यात येईल. स्मारक विस्तारासाठी जागा संपादन आणि तिथल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचे नियोजन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा- Ind vs SA 3rd ODI : केशव महाराज आणि के एल राहुल यांनी खरंच ‘जय सियाराम’चा घोष केला का? )

भिडेवाडा स्मारकाच्या जागेत मुलींसाठी अत्याधुनिक प्रशिक्षणाची सुविधा करण्याचा विचार करावा. जागेची मर्यादा लक्षात घेऊन आराखडा तयार करावा. याबाबत लवकरच बैठक घेऊन आराखड्याचे स्वरुप निश्चित करता येईल. स्मारकाची इमारत बाहेरून जुन्या काळातील वाटेल आणि आतल्या बाजूने सुसज्ज असेल, अशी व्यवस्था करावी, असेही पवार या बैठकीत म्हणाले.

या बैठकीला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (दूरदृष्य प्रणालीद्वारे), पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे उपस्थित होते.

(हेही वाचा –Ind vs SA 3rd ODI : केशव महाराज आणि के एल राहुल यांनी खरंच ‘जय सियाराम’चा घोष केला का? )

स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे
भिडेवाड्यातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे, असे या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. पुढे भुजबळ म्हणाले की, पहिली मुलींची शाळा म्हणून भिडेवाड्याचे महत्त्व असल्याने या ठिकाणी आधुनिक पद्धतीची मुलींची शाळा असावी. शाळेत अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा असाव्यात. इमारतीचा दर्शनी भाग जुन्या काळातील वाटावा. इमारतीत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याची माहिती देणारी शिल्पे असावी. इथे शिकणाऱ्या मुली स्पर्धा परीक्षेसाठी तयार व्हाव्यात. स्मारकात परदेशी पर्यटकांना माहिती देण्याची व्यवस्था असावी. या वास्तूचे ‘सावित्रीबाई फुले पहिली मुलींची शाळे’, असे नामकरण करावे, अशी सूचनाही त्यांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.