महात्मा फुले ब्राह्मणविरोधी नव्हते, ब्राह्मण्यवादाचे विरोधक होते. ब्राह्मणांपेक्षा आपल्याच लोकांनी महात्मा फुलेंना जास्त विरोध केला. महात्मा फुलेंनी पहिली शाळा भिडे वाड्यात सुरु केली. भिडे कोण? ब्राह्मण. त्यांना आपल्या लोकांनी विरोध केला. दुसरी शाळा चिपळूणकर वाड्यात सुरु केली. तेदेखील ब्राह्मण होते. असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. महात्मा फुलेंच्या विचारांना विरोध करणारे कर्मठ ब्राह्मण होते त्यापेक्षा आमच्यातले लोक जास्त होते हे आमचं दुर्दैव. त्यांना विरोध अनेकांनी फक्त अंधश्रद्धेतून केला. महात्मा फुलेंनी सगळ्या क्षेत्रात काम केलं. रामचंद्र गुहा यांनी महात्मा फुलेंचं वर्णन आधुनिक भारताचे शिल्पकार असं केलं आहे. तर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं होतं. महात्मा फुले यांनी सगळ्या समाजाचा विचार केला, कुठल्याही एका जाती, धर्माचा विचार केलेला नाही, असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी म्हटले आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यात महात्मा फुले (Mahatma Phule) आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्यांचे लोकार्पण झाले. त्या वेळी छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी हे वक्तव्य केलं.
(हेही वाचा – Bareilly (उत्तरप्रदेश) येथे बेकायदेशीर मशिदीची भिंत हिंदूंनी पाडली; पोलिसांनी पुन्हा बांधली)
या वेळी छगन भुजबळ पुढे म्हणाले की, सावित्रीबाई फुले या कवयित्री होत्या, ब्राह्मणाच्या यशवंत नावाच्या मुलाला ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी दत्तक घेतलं होतं असंही वक्तव्य छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं. सावित्रीबाई फुले शाळा काढली म्हणून प्रसिद्ध होत्या. बावनकशी, काव्यफुला हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. सत्यशोधक कुटुंबात त्यांनी शरीरविक्रय करणाऱ्या महिला, परित्यक्त्या स्त्रियांना आसरा दिला. महात्मा फुले आणि सावित्रीमाईंनी केलेलं कार्य खूप मोठं आहे. यशवंत नावाचा मुलगा त्यांनी दत्तक घेतलं होतं. ते यशवंत पुढे डॉक्टर झाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community