अमित शहा यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर केलेली टीका अगदी योग्य आहे. मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या महायुतीच्या सरकारच्या काळातच आरक्षण (Maratha Reservation) देण्यात आले. मात्र त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आले आणि त्यांना आरक्षण टिकवता आले नाही , असा आरोप मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर शंभूराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
(हेही वाचा – School Bus Accident: बेळगावात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूलबस उलटली; सहा विद्यार्थी गंभीर जखमी)
आता देखील महायुतीचे सरकार आहे. त्यानंतरच मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा झाला. तो कायदा अजूनही टिकलेला आहे. न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली नाही, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला आहे.
आमची कारवाई आधीच सुरू
मंत्री शंभूराज देसाई पुढे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील हे उपोषण मागे घेणार आहेत, याची कोणालाही कल्पना नव्हती. असे असताना देखील मराठा आरक्षणासाठी आमची कारवाई आधीच सुरू झाली होती. या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार त्यांच्या प्रत्येक मागणीवर आढावा घेतला आहे. आज झालेल्या बैठकीत मुद्देसूद चर्चा झाली. सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणी संदर्भात काय कारवाई केली? हैदराबाद गॅजेट संदर्भात कारवाई केली ? पोलिसांमधील खटले मागे घेण्यासाठी काय कार्यवाही झाली ? शिंदे समितीला मुदतवाढ देण्यासंदर्भात काय कारवाई करण्यात आली? याचा देखील आढावा घेतला. हे सर्व मनोज जरांगे पाटील यांनी अल्टिमेटम देण्याच्या आधीच झाले होते. त्यामुळे राज्य सरकारचे काम हे सुरू आहे.
मनोज जरांगे पाटील यांना सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या प्रत्येक आश्वासनावर कारवाई सुरू असल्याचा दावा शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना केला आहे. कोणताही वेळ वाया न जाता त्यांना दिलेल्या शब्दानुसार काम सुरू असल्याचेही मंत्री देसाई यांनी म्हटले आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community