राज्यात महावितरणचे सुमारे पावणे तीन कोटी ग्राहक आहेत. त्यात घरगुती ग्राहकांची संख्या एक कोटी ८४ लाख, कृषीपंपधारकांची संख्या ५० लाख, तर उर्वरित औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहक आहेत. महावितरणकडून घरगुती ग्राहकांना प्रतियुनिट ४.७१ ते १६.६४ रुपये दराने वीजपुरवठा केला जातो; मात्र आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात आदी अनेक राज्यांतील वीज कंपन्यांकडून घरगुती ग्राहकांना तुलनेने कमी दराने वीज पुरवली जात आहे. त्यामुळे महावितरणची महागड्या विजेचा बोजा राज्यातील ग्राहकांच्या डोक्यावर पडत आहे. (Mahavitaran Bill)
(हेही वाचा – Navaratri 2024: नवरात्रोत्सवात मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येणार; वाचा संपूर्ण वेळापत्रक)
उद्योगांना पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या बाबतीत हीच परिस्थिती असल्याचे महाराष्ट्र (Maharashtra) वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी स्पष्ट केले आहे, तसेच वेळोवेळी लागणाऱ्या इंधन समायोजन आकारामुळे त्यामध्ये भर पडत असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात घरगुती विजेचे दर पाच ते १७ रुपयांपर्यंत असून औद्योगिक ग्राहकांनाही पुरवल्या जाणाऱ्या विजेचे दर अधिक आहेत. त्यामुळे महावितरणच्या कारभाराबाबत वीजग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. (Mahavitaran Bill)
महावितरणचे घरगुती वीजदर
युनिट
०-१००
१०१-३००
३०१ ते ५००
५०१ ते १०००
प्रतियुनिट
४.७१ रुपये
१०.२९ रुपये
१४.५५ रुपये
१६.६४ रुपये
राज्य प्रतियुनिट दर (रुपये)
महाराष्ट्र ५ ते १६.६४
गुजरात ३.०५ ते ५.२०
आंध्र प्रदेश ३ ते ९.७५
कर्नाटक ५.९०
मध्य प्रदेश ४.२७ ते ६.८०
राजस्थान ४.७५ ते ७.९५
उत्तर प्रदेश ६.५०
तेलंगणा ३.१० ते १०
पंजाब ४.२९ ते ७.१५ (Mahavitaran Bill)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community