महावितरणचे कर्मचारी ७२ तास संपावर जाणार! खासगीकरणाविरोधात आक्रमक भूमिका

महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी मंगळवार ३ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. या कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाविरोधात संप पुकारला आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप महावितरणच्या ३० कर्मचारी संघटनांनी केला आहे.

( हेही वाचा : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राणीच्या बागेत पर्यटकांची विक्रमी गर्दी; १३ लाख ७८ हजार ७२५ रुपयांचे उत्पन्न झाले प्राप्त)

महावितरण कर्मचारी संघटना आक्रमक 

७२ तास म्हणजे एकूण ३ दिवसीय राज्यव्यापी संपामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही भागात तांत्रिक बिघाड झाल्यास, मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. महावितरणचे कर्मचारी ३ जानेवारी २०२३ रोजी मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांकडून ३ दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. महावितरण खासगीकरणाविरोधात कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. गरज पडल्यास, हा संप ३ दिवसांनंतरही सुरू ठेऊ अशी भूमिका महावितरण कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

अदानी कंपनीने वीज वितरणासाठी परवानगी मागितली आहे. यासाठी सरकारही सकारात्मक आहे त्यामुळे सरकार सुद्धा अदानी समूहाला वीज वितरणाचा परवाना देण्याची शक्यता आहे. अदानी कंपनीला कोणत्याही परिस्थितीत वीज वितरणाचा परवाना मिळू नये ही या संपकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. या खासगीकरणाविरोधात हे आंदोलन केले जाणार आहे. या संपात राज्यातील जवळपास ३० महावितरण कर्मचारी संघटना सहभागी होणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here