राज्यभरातील बत्ती बुधवारपासून गुल होण्याची शक्यता आहे. महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचा-यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. तर विज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. सरकारच्या इशा-यानंतरही संपावर जाणारच, असा ठाम निर्धार संपकरी कर्मचा-यांनी केला आहे.
काय म्हटलंय नोटीसमध्ये?
मंगळवार मध्यरात्रीपासून महावितरण, महानिर्मीती या कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर गेले आहेत. याच संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या सर्व संघटनांना नोटीस दिली आहे. यात त्यांनी मेस्मा लावणार असल्याचे सांगितले आहे.
( हेही वाचा: देशात सुरु होणार पहिला विद्युत महामार्ग! धावणार फक्त इलेक्ट्रिक गाड्या )
खासगीकरणाला तीव्र विरोध, चर्चा फिस्कटल्याने 72 तासांचा संप अटळ
महावितरण कंपनीच्या खासगीकरणाच्या हालाचालींविरोधात कर्मचा-यांनी 3 दिवसांचा संप पुकारला आहे. अदानी कंपनीला वीज वितरण परवानगी मिळाली तर कर्मचारी आणि ग्राहकांना खर्चात लोटण्याचा प्रकार असेल त्यामुळे परवानगी देऊ नये, अशी मागणी आंदोलक कर्मचा-यांनी केली आहे.