नूतन वर्षांची भेट म्हणून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एक रकमी १२० रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने (Mahavitaran) केली आहे..महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार गो-ग्रीन सेवा राबविण्यात येत आहे.
गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिला ऐवजी ई-मेल द्वारे वीज बिल पाठविण्यात येते. शिवाय गो ग्रीन ग्राहकांना मासिक वीज बिलात १० रुपये सूट देण्यात येते. आता यापुढे गो ग्रीन सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना दरमहा ऐवजी पहिल्याच महिन्यातील वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्यात येणार आहे. महावितरणने (Mahavitaran) गो ग्रीन ग्राहकांसाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गो ग्रीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्या आणि गो ग्रीन चा पर्याय निवडा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
Join Our WhatsApp Community