राज्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिम जमातींसाठी महायुती (Mahayuti) सरकारने विशेष मोर्चा वळवला आहे. पंतप्रधान जनमन योजना या माध्यमातून सरकार विविध कल्याणकारी योजना राबविणार आहे.
कातकरी, कोरकू आणि कोलाम या आदिम जमातींसाठी सरकारने ११ विभागांच्या एकूण १४ योजना जाहीर केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, त्यांच्या सूचनेनुसार राज्यातील आदिवासी समाजातील ४५ जातींनाही या योजनांचा लाभ मिळणार आहे.
(हेही वाचा – Champions Trophy, Ind vs NZ Final : भारत आणि न्यूझीलंडचे संघ यापूर्वी जेव्हा चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीत आमने सामने आले…)
राज्य सरकार (State Govt) एकूण १६ योजना राबवणार असून, त्याचा उद्देश आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आहे. यामध्ये आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीला प्राधान्य दिले जाणार आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक वुईकेंनी (Ashok Uike) आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या योजनांमुळे राज्यातील आदिम जमाती आणि आदिवासी समाजाच्या विकासाला गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community