महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नाय वरणभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हा आगामी चित्रपट येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर पाहिल्यावर मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात इतक्या खालच्या दर्ज्याची कलाकृती कदाचित झाली नसेल, असे लक्षात येते. चित्रपटाच्या ट्रेलरमधून गिरणी कामगारांच्या स्त्रिया आणि त्यांची मुले यांच्याबद्दल अत्यंत चुकीची दृश्ये आणि संवाद दाखवण्यात आले आहेत. सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारा चित्रपट बनवणार्या महेश मांजरेकरांनी समस्त मराठीजनांची माफी मागावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.
‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे आणि मराठीचा स्वाभिमान जागवणारे हेच ते महेश मांजरेकर आहेत का, असा प्रश्न यानिमित्ताने आम्हाला पडला आहे. अत्यंत घाणेरड्या शिव्या, बालगुन्हेगारी, लहान मुलांसह अश्लील दृश्ये अशा अनेक गोष्टी या चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसून येतात.
(हेही वाचा अखेर मनसेचे ‘हे’ स्वप्न झाले साकार!)
सेन्सॉर सर्टिफिकेट दिलेच कसे?
या चित्रपटाचा ट्रेलर पाहून महाराष्ट्रसह देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग’, ‘राष्ट्रीय महिला आयोग’ आणि ‘राज्य महिला आयोग, महाराष्ट्र’ यांनीही या चित्रपटावर आक्षेप नोंदवत केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्याची सेन्सॉर बोर्डाने परवानगी कशी काय दिली, असा प्रश्न असून याची चौकशी झाली पाहिजे. तसेच या चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट अजिबात देता कामा नये, अशी मागणीही समितीने केली आहे.
Join Our WhatsApp Community