इकॉनॉमिक्स टाइम्स ईटी प्राइम ‘वूमन लीडरशिप २०२३’चा शासन विभागातून यावर्षीच्या महिला नेतृत्व पुरस्कारासाठी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे यांची निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी शासनातील एकूण पाच महिला अधिकाऱ्यांची नामांकने होती. त्या पाच अधिकाऱ्यांमधून आश्विनी भिडे या विजेत्या ठरल्या आहेत. भिडे यांची ओळख मेट्रो वूमन अशी असली तरी यावर्षीचा शासनातील महिला नेतृत्व म्हणून त्यांचा या पुरस्काराने गौरव करुन त्यांच्या कामाची दखल घेतली गेली आहे.
इकॉनॉमिक्स टाइम्स ईटी प्राइम महिला नेतृत्व
पुरस्कार २०२३ या शासन विभागातील या वर्षातील महिला नेतृत्व याकरता महापालिका अतिरिक्त आयुक्त आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे यांचे नामांकन झाले होते. भिडे यांच्या सोबत संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज, पश्चिम बंगाल पूर्वा मेदिनीपूरच्या एडीएम श्वेता अगरवाल, लोकसेवा आयोग (UPSC) सदस्या सुमन शर्मा, पेयजल आणि स्वच्छता विभाग, जलशक्ती मंत्रालयाच्या सचिव विनी महाजन आदींचे नामांकन झाले होते. शासनातील या पाच वरीष्ठ महिला अधिकाऱ्यांमधून आश्विनी भिडे यांची या पुरस्कारासाठी विजेत्या म्हणून घोषित करण्यात आले. शुक्रवारी आयोजित पुरस्कार समारंभात त्यांच्या नावाची घोषणा करून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
(हेही वाचा – साखरेच्या आंतरराष्ट्रीय किमतीत विक्रमी वाढ, देशात मात्र साखरेचे दर स्थिर – केंद्र सरकार)
एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त, मुंबई मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अशी पदे भूषवत भिडे यांनी एमएमआरडीएच्या प्रकल्प कामांना आकार दिला आणि ते पूर्णत्वास नेले. तसेच मेट्रो रेल्वेच्या आव्हानात्मक कामांना गती दिली. मेट्रोचे काम जलदगतीने आणि सुरळीत सुरु असताना राज्यात ठाकरे सरकार आले आणि त्यांना त्यांनी बाजूला केले. परंतु पुढे कोविडची लाट आल्यानंतर त्यांना महापालिकेत नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात आले. तिथून मग त्यांची नियुक्ती महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी झाली. परंतु पुन्हा राज्यात सत्ता पालट झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई मेट्रो तीन प्रकल्पाला गती देण्यासाठी या प्रकल्पाची त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवली. त्यामुळे महापालिका अतिरिक्त आयुक्त आणि मुंबई मेट्रो रेल कॉर्पोेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अशी दुहेरी पण महत्वाच्या पदांची जबाबदारी त्या लीलया पार पाडत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community