आता मुंबईत आणखी एक विभाग ‘शून्यात’!

माहिममध्ये सोमवारी दिवसभरात एकाही रुग्णाची नोंद न झाल्याने जी-उत्तर विभागातील धारावी, दादर नंतर आता, माहिमही शून्याच्या पंक्तीत जाऊन बसले आहे.

धारावी आणि त्यानंतर दादरमधील कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आल्यानंतर, आता सोमवारी माहिमध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही. माहिममध्ये सोमवारी दिवसभरात एकाही रुग्णाची नोंद न झाल्याने जी-उत्तर विभागातील धारावी, दादर नंतर आता, माहिमही शून्याच्या पंक्तीत जाऊन बसले आहे.

दादर सर्वाधिक तर, धारावी सर्वात कमी

जी-उत्तर विभागातील धारावी, दादर व माहिम या विभागात सोमवारी १३ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये धारावीत ०५ तर दादरमध्ये ०८ रुग्णांची नोंद झाली. माहिममध्ये शून्य इतकी रूग्ण संख्या होती. त्यामुळे या तिन्ही विभागांमध्ये आतापर्यंत एकूण रुग्णांची संख्या १३ हजार २४३ एवढी झाली आहे. माहिममध्ये आतापर्यंत ४६१५ रुग्णांची नोंद झाली आहे. मागील काही दिवसांपासून, माहिममधील रुग्णांची संख्या एक अंकी झाली आहे. तर, दादरमध्ये सर्वाधिक ४८०२ इतकी एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे. ज्या धारावीमध्ये महापालिकेने विशेष काळजी घेतली होती आणि जागतिक आरोग्य संघटनेसह जागतिक स्तरावर कोरोनाचा आजार नियंत्रणात आणण्यात यश मिळवल्याने कौतुक करण्यात आले, त्या धारावीत आतापर्यंत एकूण ३८२६ इतकी रुग्णांची संख्या झाली आहे. त्यामुळे जी-उत्तर विभागात एकूण रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक जास्त दादर तर सर्वात कमी धारावीचा समावेश आहे.

(हेही वाचा: तिजोरी रिकामी आणि आयुक्तांचे इक्बाली ‘मंथन’!)

प्रशासनाचे कौतुक

धारावी, दादर आणि त्यानंतर आता माहिमनेही शून्य रुग्णांची नोंद केल्याने, महापालिकेच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आणि उपायुक्त विजय बालमवार यांच्यासह अतिरक्त आयुक्त संजीव जयस्वाल व आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचे कौतुक होत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here